
रत्नागिरीत आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची बैठक; उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला भीमशक्तीचा पाठिंबा !
रत्नागिरी दि. १२ ):
आंबेडकरवादी चळवळीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आज रत्नागिरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे पार पडली. या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बाळ माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत विकासाचे प्रश्न, बौद्ध समाजाच्या विविध प्रश्नांवर आणि त्यावरील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच आगामी निवडणुकांमध्ये आंबेडकरी समाजाच्या भूमिकेवरही विचार विनिमय झाला. चर्चेदरम्यान थिबा राजाकालीन बुद्धविहार संघर्ष समितीने रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आपला पाठिंबा जाहीर केला.
या बैठकीला थिबा राजा बुद्धकालीन संघर्ष समितीचे अध्यक्ष एल. व्ही. पवार, पदाधिकारी किशोर पवार, दीपक जाधव, सुनील अंबुलकर, देवेन कांबळे, दीपक अहिरे, राजेंद्र कांबळे, रत्नदीप कांबळे, संजय आहिरे, रुपेश कांबळे, बेटकर मॅडम, मुकुंद सावंत, शिवराम कदम तसेच इतर आंबेडकरी कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवण्याचा आणि विकासासाठी एकजुटीने आगामी निवडणुकांमध्ये सहभाग नोंदवण्याचा निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.




