
खेड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० केंद्रात ८० कर्मचार्यांची सुसज्जता
खेड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १० प्रभागातील २० मतदान केंद्रांमध्ये ८० कर्मचार्यांची सुसज्जता ठेवण्यात आली आहे. नगर परिषद हद्दीतील दुबार मतदारांची शोधमोहीमही हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत ६६ दुबार मतदार आढळल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी दिली.
निवडणुकीसाठी नगर परिषद शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. शिवाय महायुतीमुळे राजकीय चढाओढही सुरु आहे. इच्छुकांचीही भाऊगर्दी वाढली असून तिकीट पदरात पाडण्यासाठी नेतृत्वाकडे येरझारा सुरू आहेत. वरिष्ठ पातळीवर महायुतीचा फॉर्म्युला निश्चित झाला असला तरी स्थानिक पातळीवर मात्र मतप्रवाह भिन्न असल्याने शिवसेना-भाजप युती होईल की नाही, याबाबत सांशकताच व्यक्त केली जात आहे.www.konkantoday.com



