रत्नागिरीनजिक चर्मालय येथे पादचार्‍याला धडक देणार्‍या दुचाकीस्वारावर गुन्हा


रत्नागिरीनजिक चर्मालय येथे पादचार्‍याला धडक देवून जखमी केल्याप्रकरणी शहर पोलिसात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला. सफवान जिकीर बोरकर (२६, रा. कोकणनगर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ५ नोव्हेंबर रोजी सफवान हा बुलेट दुचाकी (एमएच ०८ बीडी ४७०६) घेवून चर्मालय ते कोकणनगर असा जात होता. रात्री ८ च्या सुमारास रस्त्याने चालत जाणार्‍या रामनिहोर छोटेलाल पटेल (४०, रा. रायपूर मध्यप्रदेश) याला सफवानच्या ताब्यातील दुचाकीची धड़क बसली. तसेच सफवान हा जखमी झाला होता, अशी नोंद शहर पोलिसात झाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button