
चिपळुणात १५ व्यावसायिकांकडून बंदी असलेले १३ किलो प्लास्टिक जप्त, दंड वसुल
बंदी असतानाही प्लास्टिकचा वापर करणार्या व्यावसायिकांना चिपळूण नगर परिषदेने मंगळवारी दणका दिला आहे. १५ जणांकडून १३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून त्यांच्याकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामुळे बाजारपेठेतील व्यावसायिकांनी धसका घेतला आहे.
प्लास्टिकपासून होणारे धोके लक्षात घेता शासनाने त्याच्या वापरावर बंदी आणली आहे. असे असतानाही बाहेरून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक येथे येत असून त्याचा व्यावसायिकांकडून सर्रास वापर होत आहे. याला आळा घालण्यासाठी नगर परिषद अधूनमधून व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारते. तरीही पूर्णपणे वापर बंद झाला नसून प्लास्टिक बंदीसाठी त्याचे उत्पादन करणार्या कंपन्यांवरच शासनाने धडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.www.konkantoday.com




