होर्मुझ सामुद्रधुनीत LPG टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला! जहाजावर होते २४ भारतीय; केंद्रीय मंत्र्यांनी दिली मोठी अपडेट!!

होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये ओमानजवळ पनामाचा ध्वज असलेल्या ‘तारा गॅस’ नावाच्या एलपीजी टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचे वृत्त आहे. या जहाजावर २४ भारतीय नागरिकांसह एकूण २५ जणांचे चालक दल (क्रू) उपस्थित होते.

महत्वाचे म्हणजे, सुदैवाने, या हल्ल्यात सर्व भारतीय नागरिक आणि इतर खलाशी पूर्णपणे सुरक्षित असून कुणालाही इजा झालेली नाही, अशी माहिती केंद्रीय जहाजबांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मंगळवारी दिली. याशिवाय, या परिस्थितीवर भारत सरकारही बारकाईने लक्ष ठेऊन आहे.

या संदर्भात केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत या घटनेची माहिती दिली. भारत सरकार या संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच, जहाजावरील भारतीय नाविकांना सर्वतोपरी मदत आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी जहाज व्यवस्थापन कंपनीशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, ब्रिटनच्या सागरी व्यापार संचालन संस्थेने ओमानच्या खासाबपासून सुमारे ७ सागरी मैल अंतरावर एका टँकरवर हल्ला झाल्याचे म्हटले असून, जहाजावरील सर्व सदस्य सुरक्षित चेही सांगितले. मात्र, या हल्ल्यात जहाजाचे किती नुकसान झाले, हे अद्याप समजू शकलेले नाही.

इराणी नौदलाचा इशारा

गेल्या २४ तासांत या भागात किमान ४ तेल टँकरचे नुकसान झाल्याच्या बातम्या समोर आल्याने समुद्री सुरक्षेसंदर्भात मोठी चिंता निर्माण झाली आहे. होर्मुझच्या पूर्वेकडील भागात आणखी एक टँकर नौदलाच्या सुरुंगाच्या संपर्कात आल्याने त्याला आग लागली. हे जहाज नेव्हिगेशन सिस्टिम बंद ठेवून प्रतिबंधित समुद्री क्षेत्रातून जात असल्याचा आरोप इराणी नौदलाने केला आहे.

दरम्यान, ब्रिटनच्या सागरी व्यापार संचालन संस्थेने ओमानच्या खासाबपासून सुमारे ७ सागरी मैल अंतरावर एका टँकरवर हल्ला झाल्याचे म्हटले असून, जहाजावरील सर्व सदस्य सुरक्षित चेही सांगितले. मात्र, या हल्ल्यात जहाजाचे किती नुकसान झाले, हे अद्याप समजू शकलेले नाही.

तत्पूर्वी, शनिवारी इराणी नौदलाने, या भागात तीन तेल टँकर सुरुंगावर आदळून स्फोट झाल्याची आणि आग लागल्याची माहिती दिली होती. या घटनांनंतर इराणी नौदलाने इतर जहाज चालकांना इशारा दिला असून, इराणी सशस्त्र दलांशी समन्वय साधल्याशिवाय प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करू नये, अन्यथा मोठे नुकसान होईल, असे म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button