पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ‘रत्नागिरीची भटकंती’ पर्यटन विशेषांकाचे प्रकाशन संपन्न


काेकण टुडे व साप्ताहिक समानताच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या रत्नागिरीची भटकंती या पर्यटन विशेषांकाचे प्रकाशन उद्याेगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी या अंकाचे संपादक सुदेश शेट्ये, उपसंपादक प्रणित शेट्ये, जिल्हा परिषद सभापती बाबू म्हाप, नगरसेवक अभिजीत दुडे, बिपिन बंदरकर, नगरसेवक राजन शेट्ये आदी मान्यवर उपस्थित हाेते.
पालकमंत्री उदय सामंत यांनी या पर्यटन अंकाच्या उपक्रमाचे काैतुक करून अभिनंदन केले. या पर्यटन अंकात उदय पर्व- निसर्गाच्या कुशीतून विकासाच्या क्षितिजाकडे झेपावणारी रत्नागिरी या लेखातून पालकमंत्री उदय सामंत यांनी गेल्या काही वर्षात पर्यटनाच्या दृष्टीने आणलेले महत्वाकांक्षी प्रकल्प व भविष्यात आणण्यात येणारे पर्यटन व विकास प्रकल्प याचा आढावा घेण्यात आला आहे.
याशिवाय या अंकात पर्यटन क्षेत्रातील मान्यवर संजय नाईक, ज्येष्ठ पत्रकार अभिजीत हेगशेट्ये, पर्यटन व पर्यावरण क्षेत्रातील प्रसिद्ध लेखक धीरज वाटेकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, रत्नागिरीतील तारांगणाची उभारणी करणारे अभिजीत भास्कर शेट्ये, इतिहासावर लिखाण करणारे व प्रसिद्ध युट्युबर राधेय राहुल पंडित, डाॅक्टर अशपाक काझी आदी मान्यवरांनी पर्यटनासंबंधी विचार व अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. हा अंक ऑनलाईन देखील उपलब्ध राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button