५९ व्या युवा महोत्सवात देव-घैसास-कीर महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी

कथालेखनात प्रियांका नेर्लेकर हिचा तृतीय क्रमांक; एकपात्री अभिनयात गौरी ओळकर हिला उत्तेजनार्थ पारितोषिक

रत्नागिरी-  भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाने ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत उल्लेखनीय यश संपादन केले. मराठी कथालेखन स्पर्धेत प्रियांका नेर्लेकर हिने तृतीय क्रमांक पटकावला, तर मराठी एकपात्री अभिनय स्पर्धेत गौरी ओळकर हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.

या यशाबद्दल भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सौ. नमिताताई कीर, कार्याध्यक्ष श्रीराम भावे, कार्यवाह धनेश रायकर व सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख ऋतुजा भोवड तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या लौकिकात भर पडली असून, कला व सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला नवे व्यासपीठ मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button