
सुरळ येथील श्री वाघजाई काळकाई देवीचा नवरात्रोत्सव ११ ऑक्टोबरपासून सुरू; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
गुहागर : तालुक्यातील सुरळ येथील श्री वाघजाई काळकाई देवी मंदिर देऊळ कमिटी व ग्रामस्थ यांच्या वतीने श्री वाघजाई काळकाई देवीचा नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
११ ऑक्टोबर रोजी सकाळी गावदेवीची मूर्ती पूजा व आरती, सायंकाळी ७.३० वा. देवीची आरती, रात्री ९ ते ११.३० यावेळेत ग्रामस्थांसाठी दांडिया नृत्य. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी गावदेवीची नेहमीप्रमाणे पूजा, सायंकाळी ७.३० वा. देवीची आरती, रात्री ९ वा. दांडिया नृत्य. १३ ऑक्टोबर रोजी
सकाळी गावदेवीची नेहमीप्रमाणे पूजा, सायंकाळी ७.३० वा. देवीची आरती, रात्री ९ वा. दांडिया नृत्य. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी गावदेवीची नेहमीप्रमाणे पूजा, सायंकाळी ७.३० वा. देवीची आरती, रात्री ९ वा. दांडिया नृत्य. १५ ऑक्टोबर रोजी
सकाळी गावदेवीची नेहमीप्रमाणे पूजा, सायंकाळी ७.३० वा. देवीची आरती, रात्री ९ वा. दांडिया नृत्य. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी गावदेवीची नेहमीप्रमाणे पूजा, सायंकाळी ७.३० वा. देवीची आरती, रात्री ९ वा. दांडिया नृत्य. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी गावदेवीची नेहमीप्रमाणे पूजा, सायंकाळी ७.३० वा. देवीची आरती, रात्री ९ वा. दांडिया नृत्य. महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक स्पर्धा. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी गावदेवीची नेहमीप्रमाणे पूजा, सायंकाळी ७.३० वा. देवीची आरती, रात्री ९ वा. दांडिया नृत्य आणि त्यानंतर पुरुष व महिलांसाठी विविध स्पर्धा. १९ ऑक्टोबर रोजी विशेष कार्यक्रम, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, महाप्रसाद, लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, विविध स्पर्धाचा बक्षीस वितरण सोहळा असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सुरळ येथील श्री वाघजाई काळकाई देवी मंदिर देऊळ कमिटी व ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.




