रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे येथे डोहात पोहण्यासाठी उतरलेल्या मुंबईतील दोन छोट्या क्रिकेटपटूंचा बुडून मृत्यू


रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे-ओझर कोंड येथील डोहात कल्याण-मुंबई येथील दोन अल्पवयीन क्रिकेटपटू मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्‍यू झाला. ही घटना गुरुवारी घडले सौरभ पवनकुमार झा (16,रा.कल्याण,मुंबई) आणि शिवम रमेश यादव (16,रा.कल्याण,मुंबई) अशी डोहात बुडून मृत्‍यू झालेल्या अल्पवयीन मुलांची नावे आहेत. सौरभ आणि शिवम ह दोघेही मुंबईहून इतर शालेय विद्यार्थी व शिक्षकांसह क्रिकेटच्या मॅचेस खेळण्यासाठी 4 ऑक्टोबर रोजी रत्‍नागिरीला आले होते.

4 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत त्‍यांच्या कोळंबे येथील मैदानावर क्रिकेटच्या मॅचेस खेळवल्या गेल्या होत्‍या. गुरुवार 8 ऑक्टोबर रोजी सकाळी त्‍यांची मॅच झाल्यानंतर दुपारी सौरभ आणि शिवम हे दोघे इतर विद्यार्थ्यांसह फिरण्यासाठी बाहेर पडले होते.ते कोळंबे ओझरकोंड येथे आले असता तेथील पाण्याच्या डोहात खेळण्यासाठी उतरले. त्‍याठिकाणी खेळत असताना त्‍यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही पाण्यात गटांगळ्या खाउन बुडू लागले. ही बाब त्‍यांचे शिक्षक साहिल खोचरेकर यांच्या लक्षात येताच त्‍यांनी आरडा-ओरडा केला असता स्थानिक ग्रामस्थांनी त्‍या ठिकाणी धाव घेत दोघांनाही पाण्याबाहेर काढले. त्‍यांना तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्‍यांना तपासून मृत घोषित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button