
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात माजी सैनिकांसाठी सुरक्षा रक्षक पदांची भरती; १९ ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
रत्नागिरी, दि. ९ ): जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प येथे ‘मनोज व्ही. यू. सिक्युरिटी एजन्सी’मार्फत माजी सैनिक संवर्गातून सुरक्षा रक्षक (सिक्युरिटी गार्ड) पदासाठी एकूण २२ जागा भरण्यात येणार आहेत.
या पदांवर काम करण्यास इच्छुक असलेल्या पात्र माजी सैनिकांनी आपली नावे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी येथे दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सादर करावीत. मुदतीनंतर येणाऱ्या अर्जांचा किंवा नावांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
या संधीचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.




