
“स्थानिकांना रोजगारासाठी पुन्हा आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही, तसेच उद्योजकांना त्रास देणाऱ्यांचीही गय केली जाणार नाही”:- ना. उदय सामंत
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील उद्योगांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारात ८० टक्के आरक्षण मिळावे, या मागणीसाठी स्थानिक लोकाधिकार सेनेच्या वतीने चंद्रपूर येथे रोजगार महामोर्चा काढण्यात आला असता राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी स्वतः चंद्रपूर येथे जाऊन या महामोर्चातील प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.
यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी “स्थानिकांना रोजगारासाठी पुन्हा आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही” असे ठोस आश्वासन देत उद्योजकांना त्रास देणाऱ्यांचीही गय केली जाणार नाही असा इशारा दिला.
गणपतीनंतर आठ दिवसांत नागपूर येथे संबंधित उद्योजक, अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विभागीय बैठक घेऊन स्थानिक रोजगाराच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेणार आहे. यापुढे चंद्रपूरच्या जनतेला रोजगारासाठी मोर्चा काढण्याची वेळ येऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे, असे म्हणत मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी भूमिपुत्रांना आश्वस्थ केले.




