
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा: इयत्ता ९ वी आणि ११ वी प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; १० एप्रिल रोजी परीक्षा
रत्नागिरी, दि. ७ ) – पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, पडवे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथे सत्र २०२७-२८ साठी इयत्ता ९ वी आणि ११ वी मधील रिक्त जागांच्या पार्श्वभूमीवर प्रवेश परीक्षेची (LEST) ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्णपणे मोफत अर्ज करता येईल. ही प्रवेश परीक्षा १० एप्रिल २०२७ रोजी घेतली जाईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य एन. के. एफ. ठाकूर यांनी केले आहे.
ठळक वैशिष्ट्ये व पात्रता:
- मोफत शिक्षण व निवास: हे विद्यालय केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत १०० टक्के अनुदानित सह-शैक्षणिक निवासी विद्यालय असून येथे मोफत शिक्षण, वसतिगृह व भोजनाची उत्तम सोय उपलब्ध आहे.
- पात्रता: अर्जदार विद्यार्थी रत्नागिरी जिल्ह्याचा मूळ रहिवासी असावा. ९ वीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी सध्या ८ वीत, तर ११ वीच्या प्रवेशासाठी सध्या १० वीत शासकीय किंवा शासनमान्य शाळेत शिकत असावा.
आवश्यक कागदपत्रे व माहिती: - विद्यार्थ्याचा फोटो व सही (१०-१० KB, JPG फॉरमॅट)
- पालकांची स्वाक्षरी (१०-१० KB, JPG फॉरमॅट)
- APAAR ID / PEN आणि आधार कार्डाची माहिती
अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक्स: - इयत्ता ९ वी: https://cbseitms.nic.in/2026/nvsix_9
- इयत्ता ११ वी: https://cbseitms.nic.in/2026/nvsxi_11
पालकांच्या मदतीसाठी विद्यालयात मोफत हेल्प डेस्क सुरू करण्यात आला आहे. अर्जात खोटी माहिती आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. अधिक माहितीसाठी परीक्षा प्रमुख श्री. आर. ए. पाटील यांच्या ९४२३३३२८८१ या क्रमांकावर संपर्क साधावा.



