जिल्ह्यात एन.एम.एम.एस. परीक्षेसाठी ५०० सराव प्रश्नपत्रिका संचांचे शाळांना मोफत वाटप


रत्नागिरी, दि. २३ ): राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षा इयत्ता आठवीच्या पूर्वतयारीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जन्म वर्षानिमित्त शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी तयार करण्यात आलेल्या ५०० सराव प्रश्नपत्रिका संचांचे जिल्ह्यातील शाळांना मोफत वितरण करण्यात आले आहे.
हा उपक्रम जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ आणि शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला आहे. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षेचा योग्य सराव करता यावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा, या उद्देशाने हे दर्जेदार प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांच्या यशासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या उपक्रमाचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांमधून मोठे स्वागत व कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button