खेड-मंडणगडमध्ये शिवसेनेची संघटनात्मक मोर्चेबांधणी

जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव ११ सप्टेंबरला दौऱ्यावर; पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिकांशी साधणार संवाद

खेड : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव हे शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी खेड व मंडणगड तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यासोबतच पदाधिकारी, शिवसैनिक तसेच नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे.
दौऱ्याची सुरुवात सकाळी ११ वाजता मंडणगड येथून होणार असून, पक्षाच्या तालुकाप्रमुख निवडीसंदर्भात आयोजित बैठकीला विक्रांत जाधव उपस्थित राहणार आहेत. ही बैठक श्री. भाई साटम यांच्या कृपा सिंधू बंगल्यावर, बोरीचा माल, मंडणगड येथे होणार आहे.
यानंतर दुपारी २.३० वाजता खेड तालुका कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. शाखाप्रमुख जनार्दन मोरे यांच्या निवासस्थानी असलेल्या सभामंडपात, कळंबणी (आपेडे फाटा), ता. खेड येथे ही बैठक होणार आहे. यावेळी पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा करून आगामी काळातील पक्षाच्या कार्याचा आढावा घेण्यात येणार आहे.
दरम्यान, सायंकाळी ५ वाजता शासकीय विश्रामगृह, खेड येथे खेड शहरातील नागरिक तसेच शिवसैनिकांच्या गाठीभेटींचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विक्रांत जाधव नागरिक व शिवसैनिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि विविध प्रश्न जाणून घेणार आहेत.
या दौऱ्यामुळे खेड-मंडणगड तालुक्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला वेग मिळण्याची शक्यता असून, आगामी काळातील पक्षाच्या रणनीतीच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
दरम्यान, या दौऱ्यात पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button