सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात मासेमारी करत असताना मासेमारी नौका बुडाल्याची दुर्दैवी घटना, मालकासह एकाचा मृत्यू


सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात मासेमारी करत असताना मासेमारी नौका बुडाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. या दुर्घटनेत बोट मालक सन्मेश सुरेश परब (वय ४९, रा.दांडी, मालवण) आणि खलाशी अक्षय हनुमंत राणे (वय ३०, रा. दांडी, मालवण) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेत सन्मेश परब यांचा मुलगा सुयोग सन्मेश परब (वय २२) याची सुखरूप सुटका करण्यात आली. . या घटनेमुळे मालवण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.सन्मेश सुरेश परब यांच्या मालकीची ‘सागरिका’ (IND MH 5 MM 1484) ही मासेमारी नौका सन्मेश परब, त्यांचा मुलगा सुयोग परब आणि खलाशी अक्षय राणे यांना घेऊन मासेमारीसाठी समुद्रात गेली होती. सकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात मासेमारी सुरू असताना नौका बुडाली. दुर्घटनेनंतर समुद्रात पडलेल्या सुयोग सन्मेश परब यांना जयदेव लोणे यांच्या नौकेने पाण्यातून सुखरूप बाहेर काढले.मात्र या दुर्घटनेत सन्मेश सुरेश परब आणि अक्षय हनुमंत राणे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोन्ही मृतदेह सापडल्याची माहिती सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी, मालवण यांच्याकडून प्राप्त झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button