राज्यात 300 कोटी वृक्षारोपण मोहीम अंतर्गत जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती बैठकसर्व यंत्रणांनी दिलेले वृक्षरोपणाचे उद्दिष्ट पूर्ण करुन ‘अमृत वृक्ष’ ॲपवर नोंदणी करावी- जिल्हाधिकारी मनुज जिंदल


रत्नागिरी, दि. 31 ) : राज्यात 300 कोटी वृक्षारोपण मोहीम अंतर्गत 35 लाख 77 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करुन, ‘अमृत वृक्ष’ ॲपवर ऑनलाईन नोंदणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, मुख्याधिकारी वैभव गारवे, तहसिलदार राजाराम म्हात्रे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मनीषा जगदाळे आदी उपस्थित होते.
सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी रणजीत गायकवााड यांनी सुरुवातीला सविस्तर माहिती दिली. विविध यंत्रणांना वाटप करण्यात आलेले उद्दिष्ट याबाबत यात माहिती होती. जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी सर्व विभागांचा यावेळी आढावा घेतला. ते म्हणाले, प्रत्येकांनी वृक्ष लागवडीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे. तसेच त्याचे ऑनलाईन नोंदणी करावी. प्रत्येक तहसिलदारांनी 10 हजार वृक्षांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे. नगरपंचायत, नगरपरिषद, मुख्याधिकारी यांनीही आपल्या क्षेत्रात वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. शिक्षणाधिकारी यांनी शाळा परिसरात, एमआयडीसीने कारखाना परिसरात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button