मार्लेश्वर देवस्थान येथे कोंडगाव-साखरपा व्यापारी संघटनेतर्फे खिचडी वाटप

आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत भाविकांसाठी अन्नदानाचा स्तुत्य उपक्रम

साखरपा (प्रतिनिधी) :
मार्लेश्वर देवस्थान येथे कोंडगाव-साखरपा व्यापारी संघटनेच्या वतीने भाविकांसाठी खिचडी वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

मार्लेश्वर देवस्थान हे कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून, विविध सण-उत्सव तसेच धार्मिक पर्वांच्या काळात येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांची सेवा आणि सामाजिक बांधिलकी जपत कोंडगाव-साखरपा व्यापारी संघटनेने खिचडी वाटपाचा उपक्रम आयोजित केला.

आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत खिचडी वाटपाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांना प्रेमपूर्वक खिचडीचे वाटप करण्यात आले. व्यापारी संघटनेच्या या उपक्रमाचे भाविकांनी व परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.

‘व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकीही महत्त्वाची’ या भावनेतून व्यापारी संघटनेने राबविलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले. अन्नदानातून गरजू आणि भाविकांची सेवा करण्याचा आनंद मिळतो, अशी भावना व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्लेश्वर देवस्थान परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button