सकल हिंदू परिवार दापोली तर्फे आयोजित 51 सत्यनारायण पूजेला उत्स्फूर्त प्रतिसाद


दापोलीः- सकल हिंदू परिवार दापोली तालुका तर्फे 51 श्री सत्यनारायण महापूजांचे आयोजन करण्यात आले होते.
हिंदू समाजातील 51 विविध ज्ञातींच्या प्रमुखांना या पूजेला बसण्याचा बहुमान देण्यात आला होता. अशी माहिती परिवाराचे प्रमुख मिलिंद शेठ यांनी दिली. सकाळी 9 वाजल्यापासून सुरू झालेल्या या सत्यनारायण पूजेच्या कार्यक्रमांमध्ये निवेदिता फास्ट न्यूज च्या श्री सत्यनारायण महापूजा विशेषाकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गडकिल्ले रक्षक आणि गोरक्षक चिन्मय गुरव आणि रघुवीर यांचा प्रतिनिधीक स्वरूपात विशेष सन्मान करण्यात आला. सायंकाळी 4 ते 7 या तीर्थप्रसादाच्या कालावधीत विविध संस्कृती दर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री लक्ष्मीनारायण महिला भजनी मंडळाचे सुश्राव्य भजन, मैत्री ग्रुप दापोली तर्फे मंगळागौरीचे सादरीकरण आणि दापोली संगीत कला मंचच्या वतीने संगीत सेवा सादर केली. यावेळी जैन साध्वी यांनी आशीर्वाद मार्गदर्शन करताना सकल हिंदू समाजाला पूजा पाठ करण्यासमवेत समाजाला अधिक बळकटी आणण्यासाठी आता अधिक कणखरतेने सामोरे जाणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. सकल हिंदू समाजाच्या हजारोंच्या संख्येने नागरिकांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला.
फोटो डिपी 03-03 श्री. सत्यनारायण महापूजेला बसलेले हिंदू समाजातील ज्ञाती बांधव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button