मनरेगा योजनेतून जिल्ह्याने केली उल्लेखनीय कामगिरी


विकसित भारत रोजगार व आजीविका अभियान (ग्रामीण) अंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणार्‍या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत जिल्ह्यासाठी ठरवून दिलेल्या एकूण मनुष्यदिन निर्मितीच्या उद्दिष्टाच्या तब्बल १०४.३६ टक्के काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे, ग्रामपंचायत यंत्रणेने या कालावधीत दिलेल्या उद्दिष्टाच्या तब्बल १४७.२ टक्के कामगिरी करत ग्रामीण भागात रोजगाराची मोठी पर्वणी उपलब्ध करून दिली आहे.
यामध्ये लांजा आणि दापोली तालुके अग्रस्थानी आहेत. जिल्हा परिषदेच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते ऑगस्ट २०२० या कालावधीत जिल्ह्यासाठी एकूण २,२०, २९८ मनुष्यदिनांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्या तुलनेत जिल्ह्यात तब्बल २,२९,९२१ मनुष्यदिनांची साध्यता (१०४.३६.४) झाली आहे. तालुकानिहाय कामगिरीचा विचार करता लांजा तालुक्याने उद्दिष्टाच्या ११९.९२ टक्के (१८,६८० उद्दिष्टाच्या तुलनेत २२,०२८ साध्य) आणि दापोली तालुक्याने १३२.१५ टक्क (३६,४५२ उद्दिष्टाच्या तुलनेत ४३,८३७साध्य) काम करीत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button