चिपळूण रस्ता रुंदीकरणासाठीच्या संपादित जागेची माहिती प्रशासनाने त्वरित द्यावी, शशिकांत मोदी यांची मागणी


चिपळूण नगर परिषदेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी चौक चिचनाका ते बहादूर शेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा एक रस्ता आणि छत्रपती शिवाजी चौक चिचनाका ते स्व. नानासाहेब जोशी मार्ग पॉवर हाऊस हे दोन रस्ते रुंदीकरणासाठी चिपळूण नगर परिषदेच्या प्रशासनाने २ आणि ३ सप्टेंबर रोजी कार्यवाही करण्याची तयारी केलेली आहे. मात्र हे काम करताना नकाशातील रेखांकन लक्षात घेऊन रुंदीकरण करावे व कोणाची किती जागा रुंदीकरणात वापरण्यात येणार त्याची व्यवस्थित माहिती नागरिकांना द्यावी, असे मत भारतीय जनता पार्टीचे गट नेते शशिकांत मोदी यांनी प्रशासनाकडे मांडले आहे. चुकीच्या पद्धतीने नव्याने रेखांकन केल्यास रस्ता होण्यास विलंब होईल. प्रशासनाने योग्य अभ्यास करावा. योग्य ती कार्यवाही करावी. सदर कामकाज करीत असताना कुठल्याही राजकीय पक्ष हस्तक्षेप होणार नाही याची काळजीही प्रशासनाने ’घ्यावी, असेही आवाहन श्री. मोदी यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button