30 लाखांपासून केली सुरुवात, आज जवळपास 3 हजार कोटींचं साम्राज्य; तरुणाई ठरली महत्वाचा फॅक्टर!

boAt Success Story : दहा वर्षांपूर्वी boAt ने बाजारात पहिले पाऊल ठेवले. पण कंपनीची खरी सुरुवात 2014 साली झाली. कंपनी उभारण्याआधी बाजाराचा अभ्यास करावा या उद्दिष्टाने boAt चे संस्थापक अमन गुप्ता आणि समीर मेहता House Of Marley या ऑडिओ ब्रँडचे देशभरात वितरण करण्याचे काम करत होते. या काळात त्यांनी देशाच्या ऑडिओ बाजाराचा अभ्यास केला. ग्राहकाची गरज काय? हे खोलामध्ये जाणून घेण्यात त्या दोघांनी अनेक वर्षे लोटली.

अनेक वर्षे बाजाराचा अभ्यास केल्यानंतर 2016 मध्ये त्यांना बाजारात संधी दिसून आली. त्याकाळी ऑडिओ मार्केटमध्ये JBL तसेच Bose यांची हवा होती. पण हे ब्रँड सामन्यांच्या खिशाला परवडणारे नव्हते. अमन आणि समीर यांना यातून कल्पना सुचली. त्यांनी स्वस्त, टिकाऊ, स्टायलिश आणि उत्कृष्ट दर्जाचे ऑडिओ उपकरणे तयार करण्याचे ठरवले.

एका ऑडिओ ब्रँडची सुरुवात साध्या केबलपासून झाली

boAt ने सगळ्यात आधी Apple Charging Cable ची निर्मिती केली. त्याकाळी बाजारात मिळणाऱ्या केबलची क्वालिटी इतकी बिकट असायची की लोकं त्यावर टेप लावून कामे चालवत होती. अमन आणि समीर यांनी या कडे संधी म्हणून पाहिले आणि बाजारात झेप घेतली. boAt च्या या केबलची किंमत 1,500 रुपये होती.

आधी चीनमध्ये तयार व्हायची उपकरणे

boAt ची पायाभरणी करताना समीर आणि अमन यांच्याकडे फार मोठा महसूल नव्हता. Contract Manufacturing च्या माध्यमातून त्यांनी चीन देशातल्या काही कंपन्यांकडून माल तयार करून घेतला. माल भारतात आणून अमेझॉनसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरून देशभरात माल विकण्यास सुरुवात केली. त्याकाळी मालाचे उत्पादन करणे कंपनीच्या संस्थापकांसाठी सगळ्यात मोठी कसरत होती.

खासकरून तरुणाईला केले टार्गेट

केबल नंतर boAt त्याच्या खऱ्या उद्दिष्टांकडे वळला. अखेर boAt ने ऑडिओ मार्केटमध्ये पहिले पाऊल टाकले. त्याकाळी देशातल्या सामान्य ग्राहकाला स्वस्त, स्टायलिश आणि उत्तम बेस असणाऱ्या उपकरणांमध्ये रस होता. इतकी वर्ष बाजाराला घोळून प्यायलामुळे boAt च्या संस्थापकांना या गोष्टीचा अंदाज होता. त्यानुसारच boAt ची उपकरणे तयार करण्यात आली. या काळात देशाची तरुणाई boAt चे मुख्य लक्ष्य होते.

boAt ने त्यांच्या प्रत्येक उपकरणाला फॅशन म्हणून लाँच केला. त्यांची उपकरणे ग्राहकांच्या गरजांसोबत स्टाईलमध्येही भर टाकत होती. 2018 ते 19 च्या काळात boAt ची पावले ऑफलाईन बाजाराकडे वळली. देशात boAt चे 5000 रिटेल स्टोअर्स खुले झाले. आतापर्यंत फक्त ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणारा boAt आता ग्राहकांच्या शहरातही उपलब्ध झाला होता.

नक्की कोणत्या गोष्टी कंपनीच्या वाढीसाठी कारणीभूत ठरल्या?

सुरुवातीला अमन यांनी 15 लाख आणि समीर यांनी 15 लाख म्हणजे एकूण 30 लाखात boAt ची पायाभरणी केली. 2018 साली कंपनीला पहिल्यांदा फंडिंग मिळाली. सुरुवातीला कंपनीचा उद्देश फक्त ऑडिओ बाजारात चांगली जागा तयार करणे हाच होता. पण याच ब्रँडने पुढे Smartwatch तसेच ट्रॅव्हल चार्जरसारखी अनेक उपकरणे बाजारात आणली. boAt ने ग्राहकांना नेहमी अग्रस्थानी ठेवले. त्यांनी ग्राहकांच्या गरजेला स्वतःचे ध्येय समजले आणि त्यानुसार उपकरणे तयार केली.

ब्रँडची एकूण महसूल व्यवस्था किती?

अर्थ वर्ष 2019 मध्ये boAt चा एकूण महसूल 239.4 कोटी रुपये होता. हीच रक्कम 2020 मध्ये 700.44 कोटी रुपयांवर पोहचली. एकंदरीत, महसुलात तिप्पट वाढ नोंदवण्यात आली. यावरून ब्रँडच्या लोकप्रियतेच्या अंदाज बांधता येऊ शकतो. अमन आणि समीर यांनी 30 लाख रुपये जोडून तयार केलेला महसूल आज 2,931 कोटी रुपयांवर पोहचला आहे.

सुरुवातीला चीनमधील उत्पादक कंपन्यांशी Contract Manufacturing करणाऱ्या boAt चे जवळपास 75% प्रॉडक्ट्स आज भारतात तयार होतात. एका तुटणाऱ्या चार्जिंग केबलला संधी म्हणून पाहिले आणि बाजारात पावले ठेवली. अमन आणि समीर यांनी इतर उपकरणांच्या कमतरतेला संधी म्हणून पाहिले आणि ग्राहकांच्या गरजेला ध्येय म्हणून पाहिले. त्यांच्या याच कौशल्यामुळे आज boAt देशातील महत्वाच्या ऑडिओ ब्रँडपैकी एक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button