
गणेशोत्सवाच्या तोंडावर रत्नागिरीत भेसळ करणार्या विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई
गणेशोत्सवाच्या तोंडावर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्या आणि निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकणार्या असामाजिक व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा उगारला आहे. उत्सवाच्या काळात मिठाई, मावा, डेअरी उत्पादने आणि किराणा मालाला प्रचंड मागणीचा फायदा घेऊन काही बेजबाबदार व्यावसायिक ग्राहकांच्या जिवाशी खेळतात. हे रोखण्यासाठी प्रशासनाने हॉटेल, मिठाईची दुकाने, डेअरी आणि किराणा दुकाने अशा २१३ दुकानांची कसून तपासणी करत ११९ नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासन निरीक्षक तृप्ती घरत यांच्या नेतृत्वाखाली एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत चार व्यावसायिक दोषी आढळले आहेत. त्यांच्या व्यवसायांवर तातडीने काम बंदची नोटीस बजावण्यात आली आहे. ग्राहकांच्या सुरक्षेशी तडजोड करणार्या त्या चार आस्थापनाना सर्व निकष पूर्ण करेपर्यंत व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.
तयार नियमभंग करणार्या आणि अस्वच्छतेत अन्नपदार्थ करणार्या आस्थापनांकडून तडजोड व दंडाच्या स्वरुपात ६९ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. सुमारे ४२५ किलो वजनाचा आणि २ लाख ४० हजार रुपये बाजारमूल्य असलेला संशयास्पद, असुरक्षित अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.




