खेडमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून नेली

कपडे धुत असताना दोघांनी संगनमताने चैन तोडून नेल्याचा आरोप; १ लाख २० हजारांचा ऐवज

खेड : तालुक्यातील भिलारे- आयनी, खोंडेवाडी येथे घराजवळ कपडे धूत असलेल्या ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन संमतीशिवाय तोडून हिसकावून नेल्याची तक्रार खेड पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिता तुकाराम तांबट (वय ६५) या १ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी कपडे धूत होत्या. त्यावेळी निलेश तुकाराम तांबट (वय ३०) आणि संदीप शिवाराम शिंदे (वय ४३), दोघेही रा. भिलारे-आयनी, खोंडेवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी, यांनी संगनमताने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन संमतीशिवाय तोडून पळवून नेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या घटनेत सुमारे १० ग्रॅम वजनाची २२ कॅरेट शुद्धतेची सोन्याची चैन, जुनी वापरती किंमत अंदाजे १ लाख २० हजार रुपये, चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर याबाबत ३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३६ वाजता खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा क्रमांक २८१/२०२६ नोंदविण्यात आला असून, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०४(२), ३(५) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, चोरीस गेलेली सोन्याची चैन आणि घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी याबाबत तपास केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button