
रत्नागिरी प्रशासनाच्या ताफ्यात नव्या वाहनांची भर; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते हस्तांतरण


रत्नागिरी, दि. १४ ): जिल्हा प्रशासनाच्या ताफ्यात आज तीन नवी वाहने दाखल झाली आहेत. ‘गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण’ या विशेष योजनेअंतर्गत प्राप्त झालेली ही नवीन वाहने पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते प्रशासनाला हस्तांतरित करण्यात आली.


या महत्त्वपूर्ण प्रसंगी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रांताधिकारी जीवन देसाई, नगरसेवक बंड्या साळवी, जि.प. सदस्य बाबू म्हाप आदी उपस्थित होते.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष बाब म्हणून ही वाहने खरेदीची परवानगी दिली होती. १ टोयाटा फॉर्च्युनर, २ टोयाटा क्रिस्टा इनोव्हा अशी वाहने जिल्हा प्रशासनाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत.




