पालकमंत्री तसेच उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदय जी सामंत साहेब यांची जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषद रत्नागिरी चे सदस्य ॲड. महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर यांच्या संपर्क कार्यालयाला भेट

  • रत्नागिरी :* जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रत्नागिरी-पावस गट ॲड. महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर यांच्या जयस्तंभ रत्नागिरी येथील संपर्क कार्यालयाला महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत साहेब यांनी आज सदिच्छा भेट दिली.

यावेळी ॲड. महेंद्र मांडवकर यांनी पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्याकडे जनहिताच्या एकूण चार महत्त्वाच्या मागण्यांची निवेदने सादर केली.

१. आशा सेविकांच्या रिचार्ज भत्त्यात वाढ : आशा सेविकांना ऑनलाईन कामांसाठी शासनातर्फे केवळ १०० रु. रिचार्ज भत्ता दिला जातो, तो वाढवून किमान ३०० रु. करावा.

२. पावस भाटीवाडी ते बाजारपेठ आर.सी.सी. पूल : गौतमी नदीवरील फूट ब्रिज धोकादायक झाल्याने बंद करण्यात आला आहे. भाटीवाडी, बकालवाडी व विद्यार्थ्यांना ४ ते ५ कि.मी. वळसा घालावा लागत आहे. तेथे कायमस्वरूपी आर.सी.सी. पूल बांधावा.

३. ऐतिहासिक घोड विहिरींचे सुशोभीकरण : रत्नागिरी-पावस हायवेवर फणसोप हायस्कूल, शेलार स्टॉप व कोळंबे फाटा येथील तीन घोड विहिरी या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील आहेत. त्यांचे पुरातत्त्व विभागामार्फत पुनरुज्जीवन व सुशोभीकरण करावे.

४. पावस येथील जुन्या ब्रिजचे पर्यटनदृष्ट्या संवर्धन : नवीन ब्रिज पूर्ण झाल्यानंतर जुना ब्रिज न पाडता त्याचे सुशोभीकरण करून रोजगार व पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करावा.

या चारही निवेदनांतील माहिती पालकमंत्री महोदयांनी सविस्तरपणे समजून घेतली व सकारात्मक कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी ॲड. मांडवकर म्हणाले की, आपण जनहिताच्या कामासाठी नेहमीच सहकार्य करता व कोणत्याही निधीची कमी पडू देत नाही हा आजवरचा इतिहास आहे.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. राहुलजी पंडित, तालुकाप्रमुख बाबुशेठ महाप, समाज कल्याण सभापती ॲड. सुयोगजी कांबळे, पंचायत समिती उपसभापती श्री. गजानन धनावडे, पावस जिल्हा परिषद गटाचे उपविभाग प्रमुख प्रवीण उर्फ बाय शिंदे, उप विभाग संघटक जितेंद्रजी शिरसेकर, गोपाळ पंचायत समिती गणाचे सदस्य नेताजी पाटील तसेच शिवसेनेचे अन्य पदाधिकारी, जिजाऊ संस्थेचे सचिव केदारजी चव्हाण आणि रत्नागिरी तालुका अध्यक्ष मंदारजी नैकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button