
डॉ. परशुराम निवेंडकर यांना ‘लाल बहादूर शास्त्रीजी आदर्श सेवा पुरस्कार’

रत्नागिरी : आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, समर्पित सेवा आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड तालुका रत्नागिरी येथील आरोग्य निरीक्षक डॉ. परशुराम तुकाराम निवेंडकर यांना ‘Lal Bahadur Shastri Ji Adarsh Seva Award’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Independence India Honour Foundation, उत्तराखंड यांच्या वतीने हा सन्मान प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे प्रमाणपत्र ८ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आले असून प्रमाणपत्रावर Reg. No. 26/1655 असा नोंद क्रमांक आहे.
यापूर्वीही डॉ. निवेंडकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन विश्व मानवाधिकार सुरक्षा आयोगाच्या वतीने डॉक्टरेट, दैनिक नवराष्ट्र मुंबई चा आदर्श आरोग्य सेवा पुरस्कार, नॅब हॉस्पिटल चिपळूण यांचा नेत्र तपासणीतील उल्लेखनीय कार्य पुरस्कार, कोविड योद्धा सन्मान तसेच रविदास परिषदेतर्फे पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
आरोग्यसेवा क्षेत्रात उत्कृष्ट योगदान, सेवाभाव, समर्पण आणि समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा गौरव करण्यात आल्याचे प्रमाणपत्रात नमूद करण्यात आले आहे.
डॉ. परशुराम निवेंडकर यांच्या या सन्मानाबद्दल जिल्हा परिषद रत्नागिरी येथील अधिकारी पदाधिकारी व आरोग्य विभागातील सहकारी, मित्रपरिवार आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या कार्यामुळे आरोग्यसेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे.




