
आदिती तटकरे यांच्या पीआरओचा अचानक मृत्यू
मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे पीआरओ म्हणून काम करणाऱ्या तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृताचे नाव आशिष मेटे असे आहे. भांडूप येथील इमारतीच्या आवारात फिरत असताना अचानक तरुण खाली कोसळला आणि त्याचा डोक्याला जोरात मार लागला.त्यानंतर तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी भांडूप पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.
नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार, आशिष मेटे हे जेवण झाल्यानंतर इमारतीच्या आवारात चालत होते. चालताचालता ते अचानक कोसळले. जमिनीवर कोसळल्यामुळे त्यांच्या डोक्याला जोरदार मार लागला. परिसरातील लोकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.




