
आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे आयोजित ‘रोटरी रेन रन २०२६’ या मॅरेथॉनचा शुभारंभ…


आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे आयोजित ‘रोटरी रेन रन २०२६’ या मॅरेथॉनचा सकाळी ६:०० वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहासमोर शुभारंभ केला.


आरोग्य, तंदुरुस्ती आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हजारो रत्नागिरीकरांनी दाखवलेला उत्साह खरोखरच प्रेरणादायी होता, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.

याप्रसंगी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे, रोटरी क्लबचे पदाधिकारी, रोटेरियन्स आणि क्रीडाप्रेमी रत्नागिरीकर बहुसंख्येने उपस्थित होते.




