रस्ते, दिवे अन् अतिक्रमणावर चिपळूण न.प.त खडाजंगी, नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले


चिपळूण शहरातील विविध विकासकामांसह अस्वच्छता, सुरक्षेचा अभाव, वाढती अतिक्रमणे आणि मगरपरिषदेतील मनुष्यबळाच्या ठेक्यावरून गुरुवारी झालेल्या चिपळूण नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या तालीम सभागृहात नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत तब्बल ३५ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. यावेळी शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला.
डॉ. आंबेडकर स्मारकाच्या अस्वच्छतेवर संताप बहादूरशेखनाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरातील अस्वच्छता आणि सुरक्षेच्या प्रश्नावर कॉंग्रेसचे नगरसेवक साजिद सरगरोह यांनी आक्रमक भूमिका घेतली. स्मारकाच्या स्वच्छाबाबत प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊनही दुर्लक्ष होला असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक योगेश पवार यांनी रात्रीच्या वेळी स्मारक परिसरात सुरक्षा रक्षक उपस्थित नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. जनतेचा पैसा खर्च होऊनही सुरक्षा नसेल तर त्याचा उपयोग काय? असा सवाल त्यांनी केला. यावर नगराध्यक्ष सकपाळ यांनी या विषयावर गांभिर्याने निर्णय घेण्याचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button