मुंबई-गोवा महामार्गावर मिठाने भरलेला ट्रक पलटी; चालक किरकोळ जखमी


राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावरील कोदवली येथील महालक्ष्मी मंदिराजवळील धोकादायक वळणावर मिठाची पोती भरून मुंबईहून गोव्याकडे जाणारा ट्रक पलटी होऊन अपघात झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास घडला.
अपघातग्रस्त ट्रक (क्र. GJ-12-BV-6644) मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जात होता. महालक्ष्मी मंदिराजवळील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर पलटी झाला.
या अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने विरुद्ध दिशेने कोणतेही वाहन येत नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र ट्रकमधील मिठाची पोती रस्त्यावर विखुरल्याने काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला.
अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पलटी झालेल्या ट्रकच्या परिसरात बॅरिकेड्स लावून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणाची अपघाताची नोंद पोलिसांनी केली असून शुक्रवारी ट्रक हटविण्याचे काम सुरू होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button