
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; उभ्या डंपरवर कार आदळून चौघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांजा तालुक्यातील शांतीनगर येथील रेस्ट हाऊसजवळ बुधवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेली क्रेटा कार (MH 01 CP 8021) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला (MH 05 EL 3877) मागून जोरदार धडकली.
या भीषण अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की, कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातातील मृतांची नावे अद्याप कळलेली नाहीत
घटनेची माहिती मिळताच पोलीस, महामार्ग पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून, अपघाताचा अधिक तपास पोलीस करत आहेत मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी डंपर उभे करून ठेवलेले असतात त्यामुळे डंपर वर वाहने धडकल्याच्या अनेक घटना याआधीही घडल्या आहेत




