
जगद्गुरू रामानंद सांप्रदयाच्या वतीने महावृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न
खेड : जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून ५ जुलै ते १९ जुलै संपूर्ण महाराष्ट्र सह इतर राज्यात वृक्षारोपण अभियान सुरू झाले असून आठ दिवसांत १ लाख २० हजाराहून अधिक वृक्ष लागवड पूर्ण झाली आहे. याच अभियानाच्या अनुषंगाने आज (१३ जुलै) रोजी खेड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मोहने ऐनवली कार्यक्षेत्रामध्ये एकाच दिवशी तब्बल १ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. रामानंद सांप्रदाय तालुका सेवा समिती खेड यांच्या वतीने ही लागवड करण्यात आली.याप्रसंगी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी वेळी खेड तालुका पंचायत समिती सभापती आफिया पालेकर, माजी नगराध्यक्ष तथा भाजप नेते वैभव खेडेकर, पं.स. सदस्य निसार जाफर सुर्वे, पं.स. सदस्य महेंद्र भोसले, समीक्षा म्हादे, पं.स. कृषी विस्तार अधिकारी अनिकेत लोहार, सुनील गावडे, ऐनवली ग्रामविकास अधिकारी अश्विनी झुंबडे, खेड तालुका खरेदी विक्री संघ संचालक विष्णू मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर मोरे, स्कूल कमिटी चेअरमन संतोष मोरे, नवयुग क्रीडा मंडळ अध्यक्ष सुमित चिकणे, रूपेश मोरे, शशिकांत मोरे, दिलीप साबळे, रामानंद संप्रदायाचे पीठ ब्लड कॅम्प प्रमुख दत्तात्रय मोरे, विलास बेंद्रे, जिल्हाध्यक्ष दीपक तावडे, पत्रकार मंगेश उर्फ भाई तावडे, सौरभ चालके, तालुकाध्यक्ष दगडू नवरे, महिला अध्यक्ष प्रज्ञा खेडेकर आदी मानव्यवरांसह रामानंद संप्रदायाचे सर्व भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.




