गजमल पिंपळी बुद्रुक येथे घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २० हजारांची रोकड लंपास

चिपळूण : तालुक्यातील गजमल पिंपळी बुद्रुक येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरफोडी केली. या चोरीत सोन्या-चांदीचे दागिने आणि २० हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख ३७ हजार २३२ रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. याप्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत हा प्रकार घडला. अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाची कडी व कुलूप कोणत्यातरी हत्याराच्या साहाय्याने उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये ३ लाख १० हजार ९११ रुपये किमतीचे ४२.१६५ तोळे सोन्याचे दागिने, ६ हजार ३२१ रुपये किमतीचे ७४.८०० तोळे चांदीचे दागिने आणि २० हजार रुपये रोख, असा एकूण ३ लाख ३७ हजार २३२ रुपयांचा मुद्देमाल आहे.

याप्रकरणी विलास रघुनाथ गजमल (वय ६१) यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ५६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ मधील संबंधित कलमांनुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा गुन्हा ८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.४४ वाजता दाखल करण्यात आला असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी शिरगाव पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button