
चिपळुणात रेल्वेच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू
चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या ओखा एक्स्प्रेसची धडकं बसून एका ४५ ते ४८ वयोगटातील प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. हा मृतदेह अनोळखी असल्याने त्याची ओळख पटवण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.




