
कासारवेली व साखरतर परिसर अंधारात, महावितरणाचा कारभारामुळे नागरिक संतप्त
रत्नागिरी शहरापासून जवळ असलेल्या कासारवेली व साखर तर भागात आज दुपारी कामासाठी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता मात्र अनेक तास उलटू नही अद्यापही या ठिकाणी खंडित केलेला वीज पुरवठा सुरू करण्यात आलेले नसल्याने नागरिकांच्यात संतप्त वातावरण निर्माण झाले आहे महावितरणाच्या या बेजबाबदार कारभाराबाबत या भागातील प्रतिष्ठित नागरिक दादा प्रसादे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे
गेल्या काही दिवसात या भागातील विद्युत पुरवठा सतत खंडित होण्याचे प्रकार घडत असतानाच आज दुपारी एक वाजता या भागातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला कामासाठी हा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विद्युत पुरवठा सुरू करण्यात येईल असे महावितरणाकडून सांगण्यात आले होते मात्र या क्षणापर्यंत एवढे तास उलटूनही विद्युत पुरवठा सुरू न झाल्याने नागरिकांच्या संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे कोणताही वादळी पाऊस नसताना हा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे कामासाठी खंडित करण्यात आलेला विद्युत पुरवठा सायंकाळी सुरू करणे आवश्यक होते सध्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे उष्णता वाढल्याने नागरिक हैराण असतानाच अनेक तास होऊनही विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला नसल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे महावितरणाच्या या कारभारामुळे नागरिकांच्यात असंतोष निर्माण झाला आहे एकीकडे स्मार्ट मीटर च्या नावाखाली अधिक दिले येत असतानाच दुसरीकडे नागरिकांना योग्य प्रकारच्या सुविधा व अखंडित विद्युत पुरवठा महावितरणाकडून होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत याबाबत वरिष्ठांनी व लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून या परिसरातील विद्युत पुरवठा तातडीने सुरू करण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे




