आबलोलीतील चंद्रकांत बाईत विद्यालयात डॉ. साक्षी उकार्डे, प्राची पोतदार-कारेकर यांचा विशेष गौरव

वैद्यकीय व कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून नावलौकिक प्राप्त केलेल्या विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थिनी डॉ. साक्षी उकार्डे आणि प्राची पोतदार-कारेकर
यांचा विशेष गौरव करण्यात आला.
वैद्यकीय क्षेत्रात डॉ. साक्षी दत्ताराम उकार्डे या एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत, तर कलाक्षेत्रात प्राची जयेंद्र पोतदार-कारेकर (प्रसिद्ध चित्रकार) हिने काढलेल्या चित्रांचा बालभारतीच्या इयत्ता तिसरी – चौथीच्या पुस्तकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. या दोघींचेही कार्य आपापल्या क्षेत्रात कौतुकास्पद आहे. या कार्याची दखल घेऊन या दोघींनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला लोक शिक्षण मंडळ आबलोली या संस्थेचे कार्याध्यक्ष सचिन बाईत, मुख्याध्यापक डी. डी. गिरी, संस्थेचे सचिव राकेश साळवी, संचालक दिनेश नेटके, प्राची यांचे आई-वडील व पती जयेंद्र पोतदार तसेच विद्यालयाचे सर्व कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी प्राची व डॉ. साक्षी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्याध्यापक श्री. गिरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन बाईत यांनीही या दोन्ही विद्यार्थिनींचे कौतुक केले विद्यालयाची गुणवत्ता व परंपरा याबद्दल समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी कार्याध्यक्ष व सत्कारमूर्ती यांच्या हस्ते मुलींसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र फुलराणी कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन वैभव ढवळ यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. व्हनमाने यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button