प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडच्या कामकाजाची उपसंचालक डॉ. दिलीप माने यांच्याकडून पाहणी

नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असतानाही अखंडित आरोग्य सेवा; कामकाजाबाबत समाधान व्यक्त


मालगुंड, दि. १८ ऑक्टोबर : प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी कोल्हापूर विभागाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी भेट देऊन आरोग्य केंद्राच्या कामकाजाची सर्वांगीण पाहणी केली. यावेळी त्यांनी आरोग्य केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य सेवा, दैनंदिन कामकाज आणि आरोग्यविषयक अभिलेखांचा आढावा घेतला. तसेच आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले.

या भेटीदरम्यान आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असतानाही नागरिकांना नियमितपणे आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जात असल्याबद्दल डॉ. दिलीप माने यांनी समाधान व्यक्त केले. प्रतिकूल परिस्थितीतही आरोग्य सेवा अखंडित ठेवण्यासाठी अधिकारी व कर्मचारी घेत असलेल्या मेहनतीचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी उपसंचालक कार्यालयाचे सांख्यिकी अधिकारी श्री. तेजस पारपोळकर, रत्नागिरीच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शीतल सूर्यवंशी, आरोग्य सहाय्यक श्री. परशुराम निवेंडकर, श्री. राहुल कोकणे व श्री. प्रमोद लिंगायत उपस्थित होते.

प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पवार, डॉ. ऋषिकेश डोके, आरोग्य सहाय्यक श्री. राजेंद्र रणसे, LHV श्रीमती सीमा पाडवी, PO श्री. आस्वाद यादव, LSO श्रीमती स्वप्नाली किनरे, मुख्यालय ANM श्रीमती स्वानंदी पवार, कनिष्ठ सहाय्यक श्रीमती विद्या मावळणकर, गणपतीपुळे येथील MPW श्री. विक्रम जाधव, सफाई कर्मचारी श्री. शैलेश जाधव, ASHA गटप्रवर्तक श्रीमती आढाव, फ्लेबोटोमिस्ट श्रीमती श्रुतिका मोहित व श्री. राहुल जाधव यांच्यासह आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

या पाहणी दौऱ्यामुळे आरोग्य केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेण्यासोबतच आरोग्य सेवा अधिक गुणवत्तापूर्ण, परिणामकारक व लोकाभिमुख करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button