
हिंदू खाटीक समाज आर्थिक महामंडळाद्वारे स्वंयरोजगारासाठी विविध कर्ज योजना ; रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापकांचे आवाहन
रत्नागिरी, दि. ८ ): जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील हिंदू खाटीक समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी नव्याने स्थापन झालेल्या ‘हिंदू खाटीक समाज आर्थिक महामंडळ मर्या.’ (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची उपकंपनी) मार्फत विविध स्वंयरोजगार कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. या महामंडळाची स्थापना ५ जून २०२५ रोजी करण्यात आली असून, समाजातील नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रमुख कर्ज योजना आणि त्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे:
1. ५० टक्के अनुदान योजना
प्रकल्प मर्यादा: कमाल ५०,००० रुपयांपर्यंत.
अनुदान: प्रकल्प मर्यादेच्या ५०% किंवा जास्तीत जास्त २५,००० रुपयांपर्यंत महामंडळातर्फे अनुदान.
उर्वरित रक्कम: बँकेमार्फत कर्ज स्वरूपात (बँकेच्या नियमांनुसार व्याज आकारणी).
परतफेड कालावधी: साधारणपणे ३ वर्षे.
2. बीज भांडवल योजना
प्रकल्प मर्यादा: ५०,००१ रुपयांपासून ते ५,००,००० रुपयांपर्यंत.
व्याजदर: महामंडळाच्या बीजभांडवल कर्जावर ४% द.सा.द.शे. व्याज.
अनुदान: प्रकल्प मर्यादेच्या ५०% किंवा जास्तीत जास्त ५०,००० रुपयांपर्यंत (याच राशीत समाविष्ट).
बँक सहभाग: ७५% बँक कर्ज (बँकेच्या नियमांनुसार व्याज).
स्वतःचा सहभाग: अर्जदाराला स्वतः ५% रक्कम भरावी लागेल.
परतफेड कालावधी: ३ ते ५ वर्षांच्या आत (समान मासिक हप्त्यांमध्ये).
3. थेट कर्ज योजना
प्रकल्प मर्यादा: १,००,००० रुपयांपर्यंत.
अनुदान: ५०% किंवा जास्तीत जास्त ५०,००० रुपयांपर्यंत.
उर्वरित रक्कम: ५०,००० रुपये महामंडळामार्फत ४% द.सा.द.शे. व्याजदराने कर्ज.
परतफेड कालावधी: साधारणपणे ३ वर्षे.
4. एनएसएफडीसी (NSFDC) योजना
प्रकल्प मर्यादा: १,४०,००० रुपयांपर्यंत.
अर्थसहाय्य: एकूण प्रकल्पाच्या ९०% रक्कम एनएसएफडीसी, नवी दिल्ली यांच्यामार्फत.
अनुदान: जास्तीत जास्त ५०,००० रुपयांच्या मर्यादेत अनुदान, उर्वरित रक्कम बीजभांडवल स्वरूपात.
अट: अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता:
अर्जदार अनुसूचित जातीतील हिंदू खाटीक संवर्गातील असावा.
वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.
राज्य महामंडळाच्या योजनेसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा शहरी व ग्रामीण भागाकरिता ३ लाख रुपयांपर्यंत असावी.
अर्जदार महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा (राज्य/केंद्र) थकबाकीदार नसावा.
आवश्यक कागदपत्रे:
सक्षम अधिकाऱ्यांचा जातीचा व उत्पन्नाचा दाखला
३ पासपोर्ट आकाराचे फोटो
रेशनकार्ड / मतदान ओळखपत्र / रहिवासी प्रमाणपत्र
आधार कार्ड प्रत व पॅनकार्ड
व्यवसायाचे कोटेशन आणि जागेचा पुरावा (आवश्यकतेनुसार)
प्रकल्प अहवाल व व्यवसायानुरूप इतर दाखले (उदा. वाहनासाठी लायसन्स, परमिट, बॅच नंबर इ.)
बँक खाते क्रमांक व पासबुकची झेरॉक्स प्रत.
संपर्क आणि अधिक माहिती:
इच्छुक अर्जदारांनी अधिक माहितीसाठी ‘जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., पाटबंधारे स्टॉप, कुवारबांव, रत्नागिरी’ येथील जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
०००




