
हातखंबा रस्त्यावरील गयाळवाडी येथे पोलिसांच्या गाडीला धडक देणार्यावर गुन्हा दाखल
हातखंबा रस्त्यावरील गयाळवाडी येथे पोलिसांच्या गाडीला धडक देऊन पळणार्या बोलेरो चालकावर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस शिपाई चालक नवनाथ विक्रम शेंडे यांनी रत्नागिरी शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. १३ जून रोजी बोलेरो चालकाने शेंडे यांच्या ताब्यातील पोलिसांच्या गाडीला धडक दिली. तसेच अपघातानंतर घटनास्थळावरुन पळ काढला अशी तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
www.konkantoday.com




