सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या वाढदिवसानिमित्त धान्य वाटपाचा सामाजिक उपक्रम


भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक 15 नगरसेविका सौ वर्षा परशुराम ढेकणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत शासकीय प्रतिमा महिला वसतिगृह रत्नागिरी येथे धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले समाजातील गरजू महिलांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला

यावेळी तांदूळ गहू साखर डाळी बिस्किटे तसेच इतर आवश्यक किराणा साहित्य वसतिगृह प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी कार्य करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला उपस्थितांनी सौ. वर्षा ढेकणे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

या उपक्रमात माजी नगरसेविका सत्यवती बोरकर मधुरा ढेकणे स्वाती रसाळ मेघा खेडेकर हेमांगी पेडणेकर रेश्मा मलुष्ट्ये ज्योती कदम आणि शमिका आगरे मनीषा कुपटे श्रेया चव्हाण वर्षा शिवगण यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला सर्वांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला

यावेळी सौ वर्षा परशुराम ढेकणे* यांनी प्रभाग क्रमांक 15 यामध्ये शासकीय प्रतिमा महिला वसतिगृहातील महिलांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व गरजा जाणून घेतल्या भविष्यात वसतिगृहातील महिलांना शैक्षणिक सामाजिक आरोग्यविषयक अथवा इतर कोणत्याही प्रकारची आवश्यकता भासल्यास आपल्या परीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले

समाजातील गरजू व वंचित घटकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आपली भूमिका कायम राहील असेही त्यांनी यावेळी नमूद केले

वाढदिवस साजरा करण्याची सामाजिक जाणीव जपणारी ही पद्धत समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले सौ वर्षा परशुराम ढेकणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या धान्य वाटप उपक्रमामुळे गरजू महिलांना मदत मिळाली असून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधिक दृढ करण्याचे कार्य या उपक्रमातून झाले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button