
संगमेश्वरात बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू
संगमेश्वर तालुक्यातील मेघी गावकरवाडी येथे एका विहिरीमध्ये नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. तर तुरळ हरेकरवाडी परिसरात शिकारीसाठी लावलेल्या लोखंडी फासकीत अडकून एका बिबट्याचा मृत्यू झाला. दोन्ही घटना शनिवारी सकाळीच उघडकीस आल्या.
मेघी गावकरवाडी येथे भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहीरीत पडला असावा, असा अंदाज बनविभागाकडून व्यक्त करण्यात आला. येथील रहिवासी सुरेश करंबेळे यांच्या मालकीच्या विहिरीत बिबट्या पडला होता. पाण्याला दुर्गंधी येऊ लागल्याने करंबेळे यांनी शनिवारी सकाळी ६ वाजता विहीरीत डोकावून पाहिले, यावेळी बिबट्या विहिरीत पडला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीन या घटनेची माहिती वन विभागाला दिली. चार दिवसांपूर्वी बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. बिबट्याच्या शरीरावरील त्वचा पूर्णपणे गळून गेली होती आणि अंगावर अळ्या पडल्या होत्या. अत्यंत खबरदारीने बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात आले. प्राथमिक तपासणीत बिबट्याचे दात, नखं आणि सर्व अवयव सुस्थितीत असल्याचे आढळून आले.www.konkantoday.com




