लांजा एसटी बसस्थानकावर बसमध्ये चढताना महिलेची सोन्याची माळ लंपास


लांजा एसटी बसस्थानक परिसरात चोरट्यांचा वावर वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून, एसटी बसमध्ये चढत असताना एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीची सोन्याची माळ अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, लांजा तालुक्यातील रिंगणे-हांदेवाडी येथील रहिवासी जयश्री एकनाथ बने (७५) या १९ मे रोजी काही कामानिमित्त लांजा येथे आल्या होत्या. त्यावेळी दुपारी ३.१५ वाजता सुटणार्‍या लांजा-झर्ये एसटी बसने त्या आपल्या गावी परतत होत्या. यावेळी बसमध्ये चढण्याच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २६ ग्रॅम वजनाची बारीक मण्यांची एक पदरी सोन्याची माळ चोरून नेली.
या घटनेनंतर जयश्री बने यांनी गुरुवारी ४ जून रोजी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी. एस रेवणे करीत आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button