लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवणार्‍या हातखंबा येथील तरूणाला जामीन


लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हातखंबा येथील व्यावसायिक अमित मधुसूदन देसाई (हातखंबा – रत्नागिरी) याला रत्नागिरी सत्र न्यायालयाने अटींसह जामीन मंजूर केला. सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी हा आदेश देताना आरोपीस आरोपपत्र दाखल होईपर्यंत हातखंबा गावाच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई केली आहे..
आरोपी अमित याने विवाहाचे आश्वासन देत दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवून फसवणूक केल्याचा आरोप पीडित महिलेने केला होता. या प्रकरणात आरोपी अमित देसाई याला १६ मे. २०२५ रोजी अटक करण्यात आली होती.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button