रायगड – रत्नागिरी – सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूकआजअखेर 6 उमेदवारांचे 12 नामनिर्देशन पत्रे दाखल ; मंगळवारी छाननी


महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज संस्थेची द्विवार्षिक निवडणूक 2026 रायगड तथा रत्नागिरी तथा सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघासाठी आजअखेर एकूण 6 उमेदवारांची 12 नामनिर्देशन पत्रे दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.
जुईली महेंद्र दळवी (अपक्ष) यांनी 30 मे रोजी 1 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सुरेंद्रनाथ यशवंत माने (शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी 4, अरविंद पुंडलिक म्हात्रे (पींझट्स ॲण्‍ड वर्कस् पार्टी ऑफ इंडिया) यांनी 1, मानसी संतोष म्हात्रे (पींझट्स ॲण्‍ड वर्कस् पार्टी ऑफ इंडिया) यांनी 1, अनिल रमेश चोपडा (अपक्ष) यांनी 1 आणि अनिकेत सुनिल तटकरे (नॅशलिस्ट काँग्रेस पार्टी) 4 असे 5 उमेदवारांची आजच्या दिवशी 11 अशी एकूण 6 उमेदवारांची एकूण 12 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. उद्या मंगळवारी दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button