
रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांच्या वेळा बदलल्या, सकाळच्या सत्रात शाळा
*रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सोमवारपासून (२२ जून २०२६) सकाळी ०७:०० ते ११:३० या वेळेत भरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) वैदेही रानडे यांनी शनिवारी (२० जून २०२६) या संदर्भातील अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे
रत्नागिरी शाळा वेळापत्रक पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यात उन्हाचा आणि कमालीचा उकाडा वाढला आहे. यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे:हा निर्णय २२ जून ते ३० जून २०२६ या कालावधीसाठी लागू असेल. सर्व शाळा सकाळी ०७:०० वाजता सुरू होतील आणि ११:३० वाजता सुटतील.
जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यानंतर शाळा नेहमीप्रमाणे नियमित वेळेनुसार पूर्ववत सुरू केल्या जातील. असेही जाहीर करण्यात आले आहे.




