
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक पतपेढीच्या चेअरमनपदी हिरालाल चावरे
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी मर्यादितच्या चेअरमनपदी न्यू इंग्लिश स्कूल, देवरूख येथील सहाय्यक शिक्षक आणि कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सक्रिय नेते हिरालाल चावरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्र, शिक्षक संघटना आणि पतपेढीच्या सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुमारे तीन वर्षांपूर्वी झालेल्या पतपेढीच्या सार्वत्रिक निवडणुकीत हिरालाल चावरे हे मोठ्या मताधिक्याने संचालक म्हणून निवडून आले होते. वाणिज्य शाखेचे पदवीधर असलेल्या चावरे यांना आर्थिक व्यवहार, सहकार क्षेत्र आणि प्रशासकीय कामकाजाचा चांगला अनुभव आहे. सध्या ते पतपेढीच्या देवरूख शाखेचे शाखा संचालक म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळत होते.
www.konkantoday.com




