रत्नागिरीतील नादब्रह्म आरती व भजन मंडळाचा प्रथम क्रमांक


सिंधुभार्गव मित्रमंडळ, सिंधुदुर्ग आयोजित दीक्षित फाउंडेशन प्रायोजित सौ. मंजिरी निरंजन दीक्षित पुरस्कृत संगीत आरती स्पर्धा नुकतीच श्री दत्त मंदिर माणगाव (जि. सिंधुदुर्ग) येथे पार पडली. या स्पर्धेत रत्नागिरीतील नादब्रह्म आरती व भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना रोख रुपये 11 हजार अणि चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेत गोवा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील एकूण 17 संघांनी सहभाग घेतला. यातून रत्नागिरीतील नादब्रह्म आरती व भजन मंडळाने प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक पंचम सवारी कला विद्यालय, देवगड, तृतीय क्रमांक बालगोपाल आरती मंडळ, देवगड, चौथा क्रमांक कलोपासक, देवगड आणि उत्तेजनार्थ क्रमांक आरंभ महिला मंडळ, कोतापूर संघाने पटकावला. तर उत्कृष्ट झांजवादक लिमयेवाडी भगिनी मंडळ कर्ला संघाच्या सौ. वर्षा जोगळेकर, उत्कृष्ट तबलावादक नादब्रह्म आरती मंडळ रत्नागिरीचा पुष्कर सरपोतदार, उत्कृष्ट ऑर्गन वादक गोपाळकृष्ण आरती मंडळ कळसवलीचा गुरुराज ठाकुरदेसाई ठरला.
पारंपरिक संगीत आरत्या जतन करणे, संवर्धन व्हावे आणि प्रसार व्हावा, हा समृद्ध वारसा पुढील पिढीला कळावा हा या स्पर्धेमागील उद्देश होता.
स्पर्धेचे परीक्षण गायक, संगीत शिक्षक श्री. अजित गोसावी, श्री. गोविंद मराठे, श्री. दामोदर शेवडे यानी केले. विजेत्यांना दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक निरंजन दीक्षित, सिंधुदुर्गचे जि. प. अध्यक्ष श्री. प्रमोद कामत, दत्त मंदिर देवस्थान माणगावचे श्री. साधले, आणि परीक्षकांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्पर्धेचे सूत्रसंचालक श्री. संजय कात्रे श्री. श्रीनिवास मराठे यानी केले.
स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते. स्पर्धा पार पडण्यासाठी ॲड. विवेक गोखले, समीर रुणकर यानी मेहेनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button