
युवासेनेतर्फे ७ जून रोजी सडेतोड वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जन्म शताब्दी आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा युवासेनेच्या वतीने सडेतोड वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा रविवारी (७ जून) सकाळी ११ वाजता माजी खासदार विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालय, गाळा नं. ९, यशोधन अपार्टमेंट, अभ्युदय नगर, नाचणे रोड, रत्नागिरी येथे होणार आहे. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तरुणाईचे विचार, वक्तृत्व आणि भूमिका निर्णायक ठरावी या हेतूने ही स्पर्धा आयोजित केली आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन उत्तर रत्नागिरी जिल्हा युवाधिकारी अजिंक्य मोरे आणि दक्षिण रत्नागिरी जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांनी केले आहे.




