मोकाट गुरांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी रत्नागिरीतील प्राणी मित्र संस्थेचा शोध सुरू


मोकाट गुरांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी रत्नागिरीतील प्राणी मित्र संस्थेचा शोध सुरू करण्यात आला आहे. अशी संस्था मिळाल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागेल असे नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी सांगितले.
शहरात गेल्या काही महिन्यांत मोकाट गुरांचा सुळसुळाट कमालीचा वाढला असून, यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनधारक अत्यंत त्रस्त झाले आहेत. शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि विशेषतः प्रचंड गर्दीचे ठिकाण असलेला आठवडाबाजार परिसरात या मोकाट जनावरांमुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. रस्त्यांच्या मधोमध ठिय्या मांडून बसणार्‍या या गुरांमुळे दुचाकी घसरून गंभीर दुखापत होण्याच्या घटना रोजच्याच झाल्या आहेत. त्यातच भाजीबाजार किंवा गर्दीच्या ठिकाणी ही गुरे आपापसात भिडल्यामुळे सर्वसामान्यांची मोठी पळापळ होते. अशा घटनांमध्ये लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर मोकाट गुरांनी हल्ला केल्याच्या आणि त्यांना जखमी केल्याच्या गंभीर तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर रत्नागिरी मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना एक महत्त्वाची माहिती दिली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button