ठाण्याहून ड्युटीसाठी आलेल्या एसटी चालकाचा देवरुखात आकस्मिक मृत्यू


संगमेश्वर तालुक्यातील वाशी तर्फे देवरुख कडुवाडी येथे ठाण्याहून आलेल्या चालकाचा अचानक मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली आहे. दीपक राजाराम कांबळे (५५, रा. कळवा पश्चिम ठाणे) असे मृत चालकचे नाव आहे. कांबळे हे वाशी तर्फे देवरुख कडूवाडी येथील साधना जाधव यांच्याकडे चालक म्हणून आले होते.
रविवारी सकाळी ७ वा. सुमारास कांबळे हे हॉलमध्ये झोपी गेले होते. कांबळे उठले आहेत का हे पाहण्यासाठी जाधव हॉलमध्ये गेल्या. हॉलमध्ये कांबळे नसल्याने अंगणात गेल्या असता कांबळे बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसून आले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button